Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !

Chidambarams big claim, naming America : अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा

New Delhi : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार मनात आला होता, मात्र तत्कालीन यूपीए सरकारने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं. जागतिक दबाव, विशेषतः अमेरिकेच्या भूमिकेमुळे हा निर्णय घ्यावा लागला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चिदंबरम म्हणाले की, “मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांत मी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. त्या काळात पुढचं पाऊल काय असेल यावर सरकारमध्ये चर्चा सुरू होती. पण त्या वेळी संपूर्ण जग नवी दिल्लीला सांगत होतं की युद्ध छेडू नका.” त्यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइस भारतात आल्या आणि त्यांनी पंतप्रधान व इतर नेत्यांना स्पष्टपणे विनंती केली ‘कृपया पाकिस्तानला प्रतिसाद देऊ नका.’

Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का

चिदंबरम यांनी मान्य केलं की, “माझ्या मनात पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार होता. पण आपल्या परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्र सेवेचा प्रभाव होता. रणांगणावर उत्तर न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.”

Where is mosque : हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का?

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाच्या 10 दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करून ताज हॉटेल, ओबेरॉय, सीएसटी, लिओपोल्ड कॅफे, कामा रुग्णालय आणि नरीमन हाऊससह अनेक ठिकाणी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 175 लोकांचा मृत्यू झाला होता. अजमल कसाब हा एकमेव जिवंत पकडला गेला होता, त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.

दरम्यान, चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर भाजपाने टीका केली आहे. काँग्रेसने एवढ्या उशिरा खुलासा करून काहीही साध्य होणार नाही, हा एक अत्यंत छोटासा खुलासा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली.

____