व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का

Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का

Standing by Pakistan, appreciated : पाकिस्तानच्या बाजूने उभे राहून कौतुकाची थाप

New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अनपेक्षित निर्णय भारतासाठी मोठा धक्का ठरला आहे. ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचं सावट निर्माण झालं आहे. यामध्ये आणखी चिंतेची बाब म्हणजे ट्रम्प यांची पाकिस्तानकडे झुकलेली भूमिका.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या कौतुकाची सरबत्ती करत, पाकिस्तान या प्रस्तावात माझ्यासोबत 100 टक्के उभा आहे, असं स्पष्टपणे सांगितलं. एवढंच नव्हे तर ट्रम्प यांच्या कुटुंबाची पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Where is mosque : हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का?

टॅरिफचा फटका आणि पाकिस्तानचं कौतुक, या दोन घटनांमुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक दशकांचे संबंध ढवळून निघाले आहेत. पाकिस्तान अमेरिकेच्या भूमिवरून भारताला परमाणू हल्ल्याची धमकी देतोय, तर दुसरीकडे अमेरिकाच त्याच्या पाठीशी उभी असल्याचं चित्र दिसतंय. यामुळे भारताच्या नाराजीत आणखी भर पडली आहे.

इस्त्रायल-हमास युद्धात मध्यस्थी करताना ट्रम्प यांनी पाकिस्तानला ठाम साथ दिल्याचंही उघड झालं. “शहबाज शरीफ आणि असीम मुनीर हे माझ्यासोबत होते, ते दोघेही अत्यंत खास आहेत,” असं ट्रम्प यांनी ब्रीफिंगमध्ये म्हटलं. ही पहिली वेळ नाही, तर कायमच ते पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत असल्याचं दिसतंय.

Ground shook : तीन गावात भूगर्भातून पाच वेळा मोठा आवाज !

दरम्यान, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे भारत आणि चीनमधील जवळीक वाढत असल्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवर बोललं जात आहे. ट्रम्प यांच्या अनपेक्षित पावलांमुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत.

error: Content is protected !!