29,000 electorate to determine the fate of 80 contenders : २९ हजार मतदार ठरवणार ८० उमेदवारांचे भवितव्य
Deulgao raja देऊळगाव राजा नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ७७ असे एकूण ८० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. शहराचे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी २९,३२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे काही दिवस पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक आता राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचारास उशीर झाल्याने सुरुवातीला वातावरण काहीसे संथ होते; मात्र आता शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी मतदारांच्या मनधरणीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
.Fadnavis on Shinde: सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची ठाम पाठराखण
मतदारांची आकडेवारी
एकूण मतदार : २९,३२६
पुरुष मतदार : १४,८५४
महिला मतदार : १४,४७२
एकूण प्रभाग : १०
मतदान केंद्रे (बुथ) : ३०
या निवडणुकीत काही उमेदवारांनी ऐनवेळी पक्षप्रवेश केल्याने व बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नगराध्यक्षपदासाठी तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असून, १० प्रभागांतील नगरसेवक पदांसाठी ७७ उमेदवार लढत देत आहेत. देऊळगाव राजा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार (८०) निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी शहरात काही ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र ही पथके केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे. आर्थिक प्रभाव व प्रलोभने रोखण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरते, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील या महत्त्वाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वरूपाची न राहता, राजकीय वर्चस्वाची लढाई ठरत असल्याचे चित्र आहे.








