Mahayuti, Nagar Vikas Aghadi declare their floor leaders : नगरविकास आघाडीकडून रंजना रामाणे, पालिकेत राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
Deulgao raja नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर देऊळगाव राजा शहराच्या राजकारणात सत्तासंतुलन स्पष्ट झाले असून, सत्ताधारी व विरोधी गटांनी आपापले गटनेते जाहीर करत आगामी काळातील राजकीय दिशा ठरवण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडून प्रदीप वाघ यांची गटनेतेपदी निवड झाली तर नगरविकास (शहर विकास) आघाडीकडून रंजना अनिल रामाणे यांची गटनेतेपदी वर्णी लागली.
महायुतीकडून प्रदीप वाघ अविरोध गटनेते
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, पीरिपा, रिपाई यांच्या महायुतीने नगरपरिषद निवडणुकीत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. २१ पैकी १२ नगरसेवक महायुतीकडून विजयी झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या दोन नगरसेवकांनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ अधिक भक्कम झाले आहे.या पार्श्वभूमीवर युवा व अनुभवी नगरसेवक प्रदीप वाघ यांची महायुतीच्या गटनेतेपदी अविरोध निवड करण्यात आली. २ जानेवारी रोजी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.या निवडीवेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नवीन नगराध्यक्ष नेहाताई शिपणे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते धनशिराम शिंपणे, गोविंद झोरे, शहराध्यक्ष सुनील शेजुळकर, युवा नेते गजानन काकड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते..
BMC Elections : पैसा जिंकला, निष्ठा हरली म्हणणारे मनसेचे नेते किशोरी पेडणेकरांच्या प्रचारात
नगरविकास आघाडीकडून रंजना रामाणे गटनेत्या
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी एकत्र येत नगरविकास (शहर विकास) आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीला मतदारांनी २१ पैकी ७ जागांवर विजय दिला. या सात नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत पत्र सादर करून रंजना अनिल रामाणे यांची गटनेतेपदी एकमताने निवड जाहीर केली.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी मेहेत्रे, काशिफ कोटकर, अन्वर शेख, दिशा किशोर खांडेभराड, अतिश कासारे, शीतल अतिश खराट आदी उपस्थित होते. पालिकेच्या सभागृहात रंजना रामाणे यांची गटनेत्या म्हणून घोषणा होताच, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विरोधी बाकावर बसून शहराच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत नगरविकास आघाडीने दिले आहेत.
Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी, नगरविकास आघाडीही सक्षम विरोधकाच्या भूमिकेत दिसत आहे. विकासकामे, निधीवाटप आणि शहराच्या प्रश्नांवरून आगामी काळात पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.देऊळगाव राजाच्या राजकारणात आता बहुमत विरुद्ध आक्रमक विरोधक अशी स्पष्ट रेषा ओढली गेली असून, याचा थेट परिणाम शहराच्या कारभारावर होणार हे निश्चित मानले जात आहे.








