व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार

Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार

Signs of major political upheaval in 2026 : 2026 मध्ये मोठ्या राजकीय उलथापालथींचे संकेत

Mumbai: 2026 हे वर्ष देशाच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून, याच वर्षात राज्यसभेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत असून, ते राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. या निवृत्तीमुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशभरात 2026 मध्ये राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 30 खासदार निवृत्त होत असून, त्यामुळे वरच्या सभागृहातील सत्तासंतुलनावरही याचा थेट परिणाम होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांपैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

BMC Elections : पैसा जिंकला, निष्ठा हरली म्हणणारे मनसेचे नेते किशोरी पेडणेकरांच्या प्रचारात

2026 मध्ये देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने, त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील या निवृत्त्या आणि नव्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत तब्बल 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमधून कोणते नवे चेहरे संसदेत प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

निवृत्त होणाऱ्या दिग्गज नेत्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे. त्याच कालावधीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांसाठीही हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.

Rahul Narvekar : हास्यास्पद आरोप पराभव झाकण्यासाठीच केले जातात !

महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या सात खासदारांमध्ये शरद पवार यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हेही एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. या सातही जागांवर कोण उमेदवार दिला जाणार, यावरून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातूनही अनेक महत्त्वाचे नेते 2026 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. याचवेळी उत्तर प्रदेशातील आणखी आठ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचाही कार्यकाळ पुढील वर्षी संपत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत आहेत.

Ajit Pawar vs Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांनी दादांना खडसावलं

याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल, तेलंगणातील काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, लोकसभेचे माजी उपसभापती थंबी दुराई आणि द्रमुक नेते तिरुची शिवा हेही राज्यसभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ मार्च 2026 मध्ये संपणार आहे.

या पार्श्वभूमीवर 2026 मधील राज्यसभा निवडणुका केवळ संख्याबळापुरत्या मर्यादित न राहता, देशाच्या राजकीय दिशादर्शक ठरणार असल्याचे मानले जात आहे. कोणते दिग्गज पुन्हा राज्यसभेत जाणार, कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आणि सत्ताधारी व विरोधकांचे समीकरण कसे बदलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!