Elections to all 29 municipalities in the state : राज्यातील संपूर्ण 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर
Mumbai: मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या पाच ते सात वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि आता त्यापाठोपाठ 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Nitin Gadkari : मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचाय
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांसाठीही याचवेळी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. 15 जानेवारी रोजी मतदान होऊन दुसऱ्याच दिवशी, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलणार, कोणत्या भागातून जाणार नवा मार्ग?
या निवडणुकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यभरात 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी केवळ मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणुकीसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि सुमारे 22 हजार बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड पद्धत लागू असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्या त्या वॉर्ड संरचनेनुसार मतदान करावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केवळ ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी
या निवडणुकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरारसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकांमध्ये आता लोकप्रतिनिधींची निवड होणार असल्याने या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष केंद्रित झाले आहे.
___








