Municipal election result : विक्रमी विजय कोणाचा, तर अवघ्या एका मतामुळे कोण ठरलं ‘कमनशीबी’

Discussions flare up after the results of the municipal council elections : नगरपालिकां नगरपंचायतच्या निवडणुक निकालानंतर चर्चांना उधान

Mumbai: राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी महायुतीने मोठा विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींपैकी 207 जागांवर महायुतीने विजय मिळवला असून भाजप 117 जागा जिंकत आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 53 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 37 जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 28, शिवसेना (उद्धव ठाकरे) 9 आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला फक्त 7 जागा मिळाल्या. इतर पक्ष आणि अपक्षांनी 32 जागा जिंकल्या आहेत.

या निवडणुकांत सर्वाधिक चर्चेत राहिला तो सातारा नगरपालिका निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांचा विक्रमी विजय. अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. मोहिते यांना 57,596 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना 15,556 मते मिळाली. विधानसभा निवडणुकीतील अनेक आमदारांच्या मतांइतकी मते मिळाल्याने हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.
मात्र, या जल्लोषातच एका ‘कमनशीबी’ उमेदवाराचीही राज्यभर चर्चा रंगली आहे.

Nagar Parishad Result : चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का!

गडचिरोली जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे उमेदवार संजय मांडवगडे यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला. अंतिम मतमोजणीत मांडवगडे यांना 716 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांना 717 मते मिळाल्याने एकाच मताने विजय-पराभवाचे चित्र स्पष्ट झाले. लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना ठरली आहे.

राज्यातील या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी 263 नगरपालिका संस्थांमध्ये मतदान झाले, तर उर्वरित 23 नगरपरिषदा आणि काही रिक्त पदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेतील अध्यक्ष आणि सदस्यांची निवडणूक तसेच सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. काही ठिकाणी भाजपने बिनविरोध विजयही मिळवला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेत भाजपची घराणेशाहीची रणनीती अपयशी ठरल्याचे चित्र दिसले. अध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या एकाच कुटुंबातील पाच नातेवाईकांचा पराभव झाला, त्यामुळे या निकालाचीही राज्यभर चर्चा झाली.

Eknath Shinde : नगरपरिषद विजय होताच एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, भाजपच्या नगरसेवकांची संख्या 2017 मधील 1,602 वरून आता 3,325 झाली आहे. त्यांनी महायुतीच्या यशाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले असून 2017 च्या तुलनेत यावेळी 129 नगरपालिका भाजपने जिंकल्या असल्याचे नमूद केले. एकूण 6,952 नगरसेवकांपैकी 4,331 नगरसेवक महायुतीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निकालांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर पैसा वापरल्याचा आरोप केला. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातच प्रत्यक्ष स्पर्धा होती, असा दावा करत त्यांनी या निवडणुकांत अक्षरशः पैशाचा पाऊस पडल्याचे म्हटले. लोकशाहीसाठी ही बाब धोकादायक असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले.

Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

एकीकडे हजारो मतांच्या फरकाने मिळालेला विक्रमी विजय, तर दुसरीकडे अवघ्या एका मताने गमावलेला विजय – या दोन्ही टोकांच्या घटनांनी यंदाच्या नगरपालिका निवडणुकांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून राज्याच्या राजकारणात याचे पडसाद आगामी काळात उमटताना दिसणार आहेत.

__