Final decision on mayor name likely be made only after Davos : मात्र महापौरांच्या नावांव दावोसनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Mumbai: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला वेग येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंबई या चार महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित झालं असलं तरी महापौरपदी नेमकं कोण विराजमान होणार, याबाबत अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही. मात्र यासंदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीकडून जिंकलेल्या महापालिकांच्या महापौरांची अधिकृत घोषणा ही येत्या रविवारनंतरच केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून ते 25 जानेवारीला भारतात परतणार आहेत. त्यांच्या परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विशेष बैठक होणार असून, याच बैठकीत मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह महत्त्वाच्या महापालिकांतील महापौरांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
Municipal Elections: मोठी खळबळ! अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा–एमआयएमची थेट युती
सुरुवातीला महापौरपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काहीसा पेच निर्माण होण्याची चिन्हं होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र, ताज्या राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी 53 शिवसेना नगरसेवक आणि 5 मनसे नगरसेवकांना एकत्र आणत 58 जणांची भक्कम युती उभी केली आहे. या गणितामुळे सत्तेत समान वाटा मागणाऱ्या भाजपवर दबाव वाढला असून, शिंदे गटाचं पारडं जड झाल्याचं बोललं जात आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाण्यात शिवसेनेचाच, म्हणजे शिंदे गटाचाच महापौर बसणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये 55 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने स्थानिक राजकारणाची सूत्रं पूर्णपणे महायुतीच्या हाती गेली आहेत. त्यामुळे या महापालिकांमध्ये महापौरपदावर शिंदे गटाचा दावा अधिक मजबूत झाला आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढली आहे. या प्रक्रियेत महापौरपद नेमकं कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे हे, स्पष्ट झाले असून त्या नुसारच उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
https://sattavedh.com/akola-mayor-race-obc-womens-reservation-for-the-akola-mayors-p
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक होणार असून, या बैठकीत केवळ महापौरांच्या नावांवरच नव्हे तर महायुतीमधील सत्तेचा समतोल, जागावाटप आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणनीतीवरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील महानगरपालिका राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
___








