Murlidhar Mohol on Ajit Pawar : आरोप सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्त होईन

If the allegations are proven, I will retire from politics : मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना चॅलेंज

Pune पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाबरोबर न जाण्याचा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे. पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी, मोहोळ यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

निवडणूक प्रचाराची सांगता करताना मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी कोणतीही नुराकुस्तीचा खेळ करत नाही.” निवडणुकीदरम्यान विरोधकांनी त्यांच्या पक्षावर विविध आरोप केले असले तरीही ते शांत आणि सकारात्मक पद्धतीने परिवर्तन करण्यावर विश्वास ठेवतात, असे मोहोळ यांनी नमूद केले.

Municipal Elections : कुठे कोट्यवधींची रोकड तर कुठे राडे, रात्रभर कोंबिंग ऑपरेशन

मोहोळ यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर भाजपचा धोरण स्पष्ट झाले आहे. भाजप स्वतंत्रपणेच महापालिका निवडणूक लढवत आहे आणि निकालानंतरही स्वतंत्रच राहणार आहे. तसेच भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील व बहुमताने निवडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी दाखवला.

तसेच त्यांच्यावर झालेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. मोहोळ म्हणाले, “अजित पवार यांनीच माझ्यावर गुंड निलेश घायवळला परदेशात जाण्यासाठी मदत केली. जर माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती येईन, नाहीतर अजित पवारांनी राजकारण सोडावे.” असा पलटवार त्यांनी अजित दादांवर केला.

Mehkar Municipal Council : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीच निवड, सत्तासमीकरण बदलले

या पत्रकारपरिषदेत प्रदेश सरचिटणीर राजेश पांडे, शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर उपस्थित होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.