Muslim festivals : नितेश राणेंच्या ‘त्या’ वत्कव्यावर काय म्हणाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ?

BJP’s working state president Ravindra Chavan refutes Nitesh Rane’s statement : प्रत्येकाला आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य

Nagpur : राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी ‘व्हर्च्यूअन ईद’ संदर्भात नुकतेच एक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही नितेश राणेंच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यावर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.

नागपुरात भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्म – पंथाच्या परंपरा व रितीरिवाजांप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि हीच भाजपची भूमिका आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. त्याबाबत चव्हाण यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी नेमके उत्तर देण्याचे टाळले.

Local Body Elections : ‘स्थानिक’ समोर दिसताच काँग्रेस अॅक्टीव मोडवर !

नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई केली जाणार का, या प्रश्नावरही चव्हाण यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी केवळ विदर्भ विभागीय कार्यशाळेबद्दल माहिती दिली. भाजपकडून देशभरात संघटन पर्वाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा आता अंतिम टप्पा आहे. राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यांत नेमणुका झालेल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या योजना तसेच केलेली महत्वाची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

Maha politics : महायुतीत ‘राजी’ ‘नाराजी’ नाट्याचे रोज नवे प्रयोग !

पर्यावरण दिवसाच्या निमित्त एक झाड मातृभूमीच्या नावाने लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसने लावलेल्या आणीबाणीविरोधात २५ जून रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली होती. त्याची आठवण जनतेला या माध्यमातून करून देण्यात येईल. केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांची भूमिका मांडल्यावर राज्य तसेच जिल्हा पातळीवर कार्यक्रम घेण्यात येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.