Abhijeet-choudhari-adviced-not-to-depend-on-gadkari-fadnavis-for-funds : नेत्यांचे शहर असल्याचे कायम दडपण राहिल्याची दिली कबुली
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर शहराला मोठा निधी उपलब्ध झाला. त्यांच्या पाठबळामुळे निधीची कधीच कमतरता भासली नाही. मात्र, ही परिस्थिती कायमस्वरूपी राहीलच असे नाही. महापालिकेला भविष्यात स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावेच लागतील. त्यासाठी मालमत्ता करात वाढ करणे आणि उत्पन्नाचे इतर पर्याय शोधणे अनिवार्य आहे, असा स्पष्ट सल्ला मावळते महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी जाता जाता दिला.
अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे बदली झाली आहे. शुक्रवारी ते जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे आपला पदभार सोपवणार आहेत. त्यापूर्वी गुरुवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Sudhir mungantiwar : शिक्षण विक्रीयोग्य नाही, शुल्क नियंत्रण समितीत आमूलाग्र बदल करा
चौधरी यांनी नागपूर महापालिकेत सुमारे पावणे तीन वर्षे सेवा दिली. यातील मोठा काळ त्यांनी ‘प्रशासक’ म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यशैलीवर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती, अगदी सत्ताधारी आमदारांनीही त्यांच्या तक्रारी केल्या होत्या. यावर भाष्य करताना ते म्हणाले, प्रशासकाच्या काळात निर्णय प्रक्रिया वेगवान होते, तांत्रिक प्रक्रियेत वेळ जात नाही. मात्र, विकासकामांत लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांचा जनतेशी थेट संपर्क असल्याने लोकांसाठी काय आणि कसे हवे, याचे योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. प्रशासक आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही व्यवस्थांसोबत काम केल्यामुळे मला समृद्ध अनुभव मिळाला.
नेत्यांचे शहर असल्याने कामाचे दडपण
नागपूर हे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे शहर असल्याने कामाचे थोडे दडपण असायचे, असे त्यांनी कबूल केले. येथे काम करताना नेहमी ‘अलर्ट’ राहावे लागायचे. मात्र, दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याचा हा अनुभव आता पुण्यात काम करताना नक्कीच उपयोगात येईल. शहरात गेल्या तीन वर्षांत अनेक सुधारणा आणि चांगले निर्णय घेता आल्याचे समाधान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Sudhir mungantiwar : दालमिया सिमेंट कंपनीतील अपघातप्रकरणी जखमी कामगारांना २५ लाखांची मदत द्या !
वाहतूक कोंडीबाबत धोक्याचा इशारा
नागपूरच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करताना चौधरी म्हणाले की, शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. इतर मोठ्या शहरांमध्ये ही समस्या आता हाताबाहेर गेली आहे, नागपूरची तशी अवस्था होऊ नये यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आतापासूनच खबरदारी घ्यावी.
Bacchu Kadu : तर वनमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा
तक्रारींचा चेंडू नगरसेवकांच्या कोर्टात
नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला होता. आता महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधींचे शासन आले असल्याने, या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवरच असेल, असे संकेत देत त्यांनी चेंडू लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टोलवला आहे.








