Nagpur municipal corporation election : शिंदे सेनेची कोंडी; भाजप भाव देत नाही, कार्यकर्त्यांना धीर नाही

BJP – SHIVSENA yuti likely to be break in Nagpur : दोन प्रभागाएवढ्या जागा द्यायलाही भाजपची तयारी नाही, युती धोक्यात

Nagpur नागपूर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दोन प्रभागाएवढ्या जागा देण्याची तयारी देखील भाजपने दाखवली नाही, त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे भाजप भाव देत नाही आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना धीर नाही, अशी शिंदे सेनेतील नेत्यांची अवस्था आहे.

शिवसेनेच्यावतीने ५० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला देण्यात आला होता. मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. फक्त पाच जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला स्वबळावर लढावे लागणार आहे. कालपर्यंत भाजप आणि शिंदे सेना युती करून लढणार असल्याचा दावा दोन्ही पक्षाकडून केला जात होता.

Nagpur municipal corporation election : कट्टर समर्थकांना उमेदवारी नाकारली, नव्या चेहऱ्यांना संधी

दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. शिवसेनेच्यावतीने आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव, शहर प्रमुख सूरज गोजे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे आणि त्‍यांच्या प्रभागाची यादीत भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्याकडे सोपवली होती. हा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावल्यानंतर २० जागा सोडाव्या अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र त्यालाही भाजपने नकार दिला. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचा संवाद बंद झाला.

भाजपने पाच जागा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. मात्र शिवसैनिकांनी यापेक्षा स्वबळावर लढावे असा आग्रह धरला आहे. सोमवारी शिवसेनेसोबत बोलणी न करताच भाजपने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले. हे बघता आता शिवसेनेच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भाजप सर्व जागांवर लढणार असल्याचे दिसून येते.

Municipal election : शिवसेना शिंदे गटाला महापालिका रणधुमाळीत मोठा धक्का

 

शिवसेनेला सोडायच्या पाच जागा सोडून भाजपने जवळपास सर्वच प्रभागातील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यापैकी ८० टक्के उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या युतीच्या आशा मावळल्या आहे. रात्री उशिरा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे भाजपतर्फे एबी फॉर्म वाटप केले जात असल्याची कल्पना रात्रीपर्यंत उशिरापर्यंत शिवसेनेला नव्हती.

आमच्याशी भाजपच्यावतीने कोणी संवाद साधला नाही अशा तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरे सेना आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकी १२ ते १५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसने अद्याप अधिकृत आघाडी जाहीर केली नसली तरी उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीला याची सूचना दिली आहे.