Nagpur Municipal corporation : शिवसेनेचा ‘झिरो’ स्ट्राईक रेट; तरीही भाजप स्वीकृत सदस्य देणार?

bjp-shiv-sena-alliance-zero-strike-rate-nominated-member-dispute : युतीत धुसफूस वाढली; गणेश चर्लेवार एकमेव विजयी, तरीही शिवसेनेचा दावा

Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १०३ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली असली, तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतच्या (शिंदे गट) युतीवरून आता भाजपमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी फाटला आहे. अवघ्या ८ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेचा ‘स्ट्राईक रेट’ तांत्रिकदृष्ट्या शून्य ठरला असतानाही, मुख्यमंत्र्यांनी दिलेले ‘स्वीकृत सदस्य’ (Nominated Member) पदाचे आश्वासन पाळले जाणार का? यावरून भाजपच्या गोटात मोठी खडाजंगी सुरू झाली आहे.

युतीमध्ये शिवसेनेला ८ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ गणेश चर्लेवार हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. चर्लेवार हे मूळचे स्वयंसेवक असून ते भाजपच्याच विचारसरणीचे आहेत. केवळ युतीचा धर्म म्हणून त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली. शिवसेनेच्या कोट्यातील उर्वरित ७ जागांवर भाजप पुरस्कृत किंवा शिवसेनेचे उमेदवार पूर्णपणे पराभूत झाले. त्यामुळे युतीचा भाजपला फायदा होण्याऐवजी काही हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या, असा आक्षेप भाजपचे स्थानिक नेते घेत आहेत.

Nagpur Municipal Corporation : सत्तेच्या चाव्यांवरून भाजपमध्ये जुंपली, स्थायी समितीची निवड रखडली!

नागपूर महापालिकेत एकूण १० स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ८ ते ९ जागा येणार आहेत. तिकीट न मिळालेल्या आणि बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने सुमारे २४ प्रमुख कार्यकर्त्यांना ‘स्वीकृत सदस्य’ करण्याचे आश्वासन देऊन शांत केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला एक स्वीकृत सदस्य देण्याचे शब्द दिले आहेत. मात्र, शिवसेनेची कामगिरी पाहता हा कोटा आपल्याच निष्ठावंतांना मिळावा, असा दबाव कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वावर आणला आहे.

Amravati Municipal Corporation : एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मीरा कांबळेंची पक्षातून हकालपट्टी

जागावाटपाच्या वेळी भाजपने शिवसेनेला शेवटच्या दिवसापर्यंत ताटकळत ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजपचा प्रतिसाद न मिळाल्याने आधीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेला केवळ ८ जागा देऊन त्यांची कोंडी करण्यात आली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी करून युती टिकवली असली तरी, या युतीमुळे भाजपचे संख्याबळ घटले आणि शिवसेनेचे संघटनही दुखावले गेले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.