Namaz at Shaniwarwada : शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल !

Medha Kulkarni, Rupali Thombre face to face, politics heats up : मेधा कुलकर्णी, रुपाली ठोंबरे आमनेसामने, राजकारण तापले

Pune : ऐतिहासिक शनिवारवाड्यात काही महिलांकडून सामूहिक नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या वारसास्थळावर धार्मिक विधी केल्याचा आरोप होत असून, या घटनेनंतर विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शनिवारवाड्याच्या आवारात काही महिलांनी प्रार्थना केली, असा व्हिडिओ रविवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाला. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे समजते. या व्हिडिओनंतर काही हिंदू संघटनांनी शनिवारवाड्याबाहेर निदर्शने केली आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पुरातत्त्व विभागानेही या प्रकरणात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mahadevrao Shivankar : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन

दरम्यान, या घटनेनंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या. त्यांनी पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा आणि त्या ठिकाणी शुद्धीकरणासाठी गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना शनिवारवाड्यात प्रवेश नाकारला. यावेळी मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा आहे. मेधा कुलकर्णी यांनी, “ज्या ठिकाणी नमाज पठण झाले, त्या ठिकाणी आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे,” असा पवित्रा घेतल्यामुळे वातावरण आणखी तंग झाले.

Devendra Fadanvis : ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ मिळेल !

या पार्श्वभूमीवर पुण्यातील महायुतीतही वाद उफाळले. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, “शनिवारवाडा ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. ती मराठा साम्राज्याची आणि सर्व पुणेकरांची आहे. मेधा कुलकर्णी या खासदार असूनही जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा.”

रुपाली ठोंबरे यांनी पुढे म्हटले की, “कोथरुडनंतर आता कसब्यातून येऊन त्या नाटकं करत आहेत. त्यांना प्रार्थना असो वा दुवा, यातील फरक समजत नाही. शनिवारवाड्यात त्यांनी केलेल्या कृतीसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.”

शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे पुण्यातील वातावरण तंग झाले आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

_____