व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Narendra Modi : ७.०८ टक्के विकासदराने भारताची भरारी; पंतप्रधान मोदींचे जनतेला मोठे...

Narendra Modi : ७.०८ टक्के विकासदराने भारताची भरारी; पंतप्रधान मोदींचे जनतेला मोठे आवाहन

narendra-modi-7-08-percent-gdp-growth-appeal-swadeshi-developed-india : ‘स्वदेशी’चा मंत्र जपत विकसित भारतासाठी साथ द्या

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या व्हिडिओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला आहे. जगभरात अस्थिरता आणि संकटांचे वातावरण असतानाही भारताने विकासाचा वेग कायम ठेवला असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना ‘स्वदेशी’चा मंत्र स्वीकारण्याचे आवाहन केले. यावेळी मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधत देशातील निराशावादी वातावरणावर टीका केली.

कोरोना महामारीपासून जागतिक पातळीवर पुरवठा साखळीतील अडथळे आणि विविध संकटे कायम असल्याचे मोदी यांनी म्हटले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताने अडथळ्यांवर मात करत २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत ७.०८ टक्के विकासदर नोंदवला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारताने मिळवलेला हा विकासाचा वेग कायम ठेवणे आणि प्रगतीत सातत्य राखणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे मोदी यांनी आवाहन केले. ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र अंगीकारत देशात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परदेशात पर्यटनासाठी जाण्याऐवजी देशातील पर्यटनस्थळांना भेट द्यावी, तसेच परदेशात विवाहसोहळे आयोजित करण्याची प्रवृत्ती टाळावी, असेही त्यांनी म्हटले.

Eknath Shinde Bacchu Kadu : शिंदे-कडूंच्या मध्यस्थीनंतर मेंढपाळांचे आंदोलन स्थगित; पुढील आठवड्यात मुंबईत बैठक

गरज नसताना सोने खरेदी न करण्याचे आवाहनही मोदी यांनी केले. देशांतर्गत उत्पादन आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळाल्यास आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा विकसित भारताची जबाबदारी तरुण पिढीच्या हातात सोपवायची आहे, असे मोदी यांनी सांगितले. तरुणांच्या स्वप्नांना आजच्या मेहनतीतून आकार देण्याचे आवाहन करत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावावी, असे त्यांनी नमूद केले.

District Women Hospital Dafrin hospital : फायर, इलेक्ट्रिक ऑडिटसह पीडब्ल्यूडी अभियंत्यांची झाडाझडती

देशाच्या विकासासाठी सरकारची नीती योग्य असून नियतही स्वच्छ असल्याचा दावा मोदी यांनी केला. १४० कोटी देशवासीयांची एकजूट ही भारताची सर्वात मोठी ताकद असून त्यातून देशाला आणखी उंचीवर नेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘चला, आनंद साजरा करूया आणि संकल्पही करूया. संकल्प सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत चला,’ असे आवाहन करत मोदी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!