व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nashik-tcs-case : टीसीएस प्रकरणात मोठे धागेदोरे, ‘एमआयएम कनेक्शन’नंतर राजकीय खळबळ !

Nashik-tcs-case : टीसीएस प्रकरणात मोठे धागेदोरे, ‘एमआयएम कनेक्शन’नंतर राजकीय खळबळ !

nashik-tcs-case-national-women-commission-report-submitted-to-devendra-fadnavis : राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर

Mumbai : नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस प्रकरणात नवे खुलासे समोर येत असतानाच राष्ट्रीय महिला आयोगाने सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात कार्यस्थळी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या असून राज्य सरकारकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी चर्चा रंगली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने सादर केलेल्या अहवालात २५ हून अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, जबाबदारी निश्चित करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत ठोस उपाय सुचविण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने १८ आणि १९ एप्रिल रोजी नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी चर्चा केली होती. त्यानंतर ५० हून अधिक पानांचा सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता विशेष तपास पथकाकडून तिची कसून चौकशी केली जाणार असून अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्मांतर प्रकरणात तिची नेमकी भूमिका काय होती, २५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, कोणाच्या संपर्कात होती, तसेच मुंबई, मुंब्रा आणि भिवंडी परिसरात तिला कोणी आश्रय दिला होता याचा तपास सुरू आहे.

Reservation for local : भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारचा मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक !

तपासादरम्यान आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. एमआयएमशी संबंधित नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच कौसर पार्क परिसरात खरेदी केलेल्या घरात निदा खान आणि तिच्या कुटुंबाला आश्रय देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त केला असून त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणा आता निदा खानचे मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन तपासत आहे. मलेशियातील इम्रासोबत तिचा काही संबंध आहे का, तसेच मतीन पटेल आणि निदा खान यांची ओळख नेमकी कशी झाली याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात आधीच अटकेत असलेले शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांची चौकशीही सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sanjay shirsat : मंत्री संजय शिरसाटांचा गंभीर आरोप; इम्तियाज जलीलांच्या चौकशीची मागणी

दरम्यान, निदा खानने आपण गर्भवती असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला अटक केली. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी कोणती नावे समोर येतात आणि सरकार कोणती कठोर पावले उचलते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!