NCP : शरद पवार निवृत्त होणार, अजित पवारांकडे सूत्रे?

Ajit Pawar may lead NCP if Sharad Pawar steps down : पालिका निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची चर्चा

 Mumbai .महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडामोडींमध्ये अजित पवार यांना राज्यातील नेतृत्वाची सूत्रे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर सुप्रिया सुळे Supriya Sule दिल्लीतील पक्षाचे व्यवहार सांभाळतील. शिवाय त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या निवृत्तीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. कदाचित त्यानंतर शरद पवार निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. याआधीही शरद पवारांनी आपण निवृत्त होणार असल्याचे म्हटले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते पुन्हा एकदा सक्रिय झाले.

Pune Municipal Corporation Elections : शिवसेनेच्या बैठकीत खळबळ; पुणे शहरप्रमुख रागातच पडले बाहेर

अजित पवार हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रशासनात प्रभावी कामगिरी केली असून पक्षातील मोठा गट त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करून अजित पवार यांना राज्यातील राजकीय धोरणे ठरवण्याचे अधिकार दिले जातील, अशी माहिती मिळत आहे.

Varsha Gaikwad : BMC म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे केंद्र, काँग्रेसचा आरोप

दुसरीकडे, सुप्रिया सुळे या दिल्लीतील पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळतील. संसदेत त्यांचा अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावरील संपर्क यामुळे पक्षाला केंद्रात बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दिल्लीतील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज बुलंद करण्यासाठी सुळे यांना महत्त्वाची भूमिका दिली जाणार आहे. त्या पक्षाच्या धोरणांना राष्ट्रीय स्तरावर मांडतील आणि इतर पक्षांशी संवाद साधतील.

या घडामोडींमध्ये शरद पवार यांचा निर्णय सर्वाधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली. कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. जर शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक युग संपुष्टात येणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.