Shivseva Pune city chief walks out of the meeting : नाना भानगिरे यांचा व्हिडीओ व्हायरल, निवडणुकीपूर्वीची अस्वस्थता
Pune महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेत अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. शहरप्रमुख नाना भानगिरे Nana Bhangire यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीतून रागारागात बाहेर पडून निघून जाण्याची घटना घडली. हा प्रकार पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडला, जिथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे आणि इतर शहर नेते उपस्थित होते. बैठकीचा विषय मुख्यतः महायुतीतील जागावाटपाचा होता, ज्यात भाजपाशी चर्चा आणि पक्षाची तयारी यावर बोलणे अपेक्षित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत जागावाटपावरून तीव्र मतभेद निर्माण झाले. शिंदे सेनेने पुणे महापालिकेत जेवढ्या जागांची मागणी केली होती, तेवढ्या जागा भाजपाकडून न दिल्याने पक्षात नाराजीची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर बैठकीत नाना भानगिरे यांच्यात आणि इतर नेत्यांमध्ये वादावादी झाली. यामुळे भानगिरे यांना प्रचंड राग अनावर झाला आणि ते बैठक अर्धवट सोडून हॉटेलबाहेर पडले. त्यांच्या रागात निघून जाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते जलदगतीने चालताना दिसत आहेत.
Varsha Gaikwad : BMC म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे केंद्र, काँग्रेसचा आरोप
बैठकीत झालेल्या वादानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट भूमिका मांडत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, “बैठकीत काही गैरसमज झाले, पण त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. सर्व नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मतभेद दूर करतील. पक्षात एकजूट आहे आणि महापालिका निवडणुकीत पक्ष ताकदीने उतरेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, नाना भानगिरे हे पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. बैठकीत झालेल्या वादामुळे त्यांना भावनिक धक्का बसला असावा, पण पक्षाच्या हितासाठी सर्वजण एकत्र येतील. गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, अफवांना बळी पडू नये आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा.
Akola Municpal Corporation Election : भाजप उमेदवारांची यादी दोन दिवसांत होणार ‘फायनल’!
गोऱ्हे यांच्या या वक्तव्याने प्रकरण थोडे शांत करण्याचा प्रयत्न दिसतो, मात्र पक्षातील नाराजी अजूनही कायम आहे. गोऱ्हे यांनी जागावाटपाबाबतही स्पष्ट केले की, भाजपाचा १५ जागांचा प्रस्ताव ही फक्त ऑफर आहे, त्याला पक्षाने मान्यता दिलेली नाही. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी सांगितले.








