Breaking

NCP Sharad Pawar : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच; जयंत पाटलांचा अखेर राजीनामा

Jayant Patil resigns, Shashikant Shinde is new state president of Pawar NCP : राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे, एकमताने निवड

Mumbai : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी आज राजीनामा दिल्यानंतर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. शशिकांत शिंदे यांची एकमताने प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष बदलाचा कसा परिणाम होणार, याची उत्सुकता लागलेली असेल.

जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. ते शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ठाकरे गटाच्या आमदारांची शिंदेंच्या मंत्र्यांसोबत शाब्दिक चकमक, विधानसभेत गदारोळ

शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. ते मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Local Body Elections : अमरावतीत भाजप-स्वाभिमानी पक्षाचं ठरेना!

शिंदे लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. 1999 साली त्यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि बारा हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.

Monsoon session : ऐतिहासिक विश्रामगृह पाडल्याचा वाद विधीमंडळात

शशिकांत शिंदे हे दोनवेळा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षकडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या शिंदे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.