Congress Leader MLA Vikas Thackeray’s complaint to the Chief Minister Devendra Fadanvis : एमएसआयडीसीचे प्रमुख ब्रजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू
Nagpur : नागपूर शहरानजिक दाभा येथील भारतीय वायुसेनेच्या प्रस्थापनाच्या शेजारी असलेली जमीन सार्वजनिक सुविधा आणि संरक्षण प्रस्थापनाच्या नो डेव्हलपमेंट झोनसाठी आरक्षित आहे. कुठलीही परवानगी न घेता या भुखंडावर बेकायदेशीरपणे प्रदर्शन केंद्र उभारले जात आहे. निवडक खासगी संस्थांना लाभ मिळावा, यासाठी नियमांची ऐसीतैसी केली जात असल्याचा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आमि काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार ठाकरे यांनी तक्रार केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागपूर सुधार प्रन्यासकडेही (NIT) तक्रार करून सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर एफआयआर करण्यास सांगण्यात आलेले आहे. याशिवाय भारतीय वायुसेनेचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांनाही पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार ठाकरे यांनी केलेली आहे.
Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक मैदाने इतर कोणत्याही हेतूसाठी वापरण्यास मनाई केलेली आहे. २६.०२.२०२५ रोजी जनहित याचिकेमध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सरकारच्या १३.०७.२००४ व ३१.०५.२०११ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून कृषी विद्यापीठाची ही जमीन विद्यापीठाच्या वापरासाठीच मर्यादित राहील. खासगी प्रतिसादकांना बांधकाम अथवा विकास कार्य करण्यास न्यायालयाने मनाई केलेली आहे. त्यामुळे सुरू असलेले बांधकाम हे न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान असल्याचे आमदार ठाकरे यांनी म्हटले आहे.
Yatras in India : रेल्वे तिकीटांवर सिंदूर आणि मोदींचा फोटो, कोण करतंय राजकारण ?
भारतीय वायुसेनेच्या प्रवेशद्वारासमोर असलेली ही जमीन महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्याप्रमाणे झुडपी जंगल म्हणून नोंदवलेली आहे. या जमिनीवर बांधकाम करण्यास पूर्णपणे मनाई आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची ही जमिन आहे. कृषीवन शिक्षण व संशोधनासाठी या जमिनीचा वापर होतो. २०२०-२१ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने येथे कृषीवन वृक्षारोपण केले होते. नागपूर विकास आराखड्यानुसार स्मशानभूमी, सार्वजनिक सेवा सुविधा बसस्थानक, माध्यमिक शाळा, रस्ता व गोल्फ क्लप मेदानासाठी ही जमिन आरक्षित आहे. त्यामुळे येथे प्रदर्शन केंद्र उभारणे पू्र्णतः बेकायदेशीर असल्याचेही आमदार विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.