व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nitin Gadkari : धर्माच्या नावाखालील राजकारण समाजासाठी घातक !

Nitin Gadkari : धर्माच्या नावाखालील राजकारण समाजासाठी घातक !

Nitin Gadkari directly told, keep ministers and leaders away : नितीन गडकरींनी थेटच सुनावले, मंत्री नेत्यांना दूर ठेवा

Nagpur : मंत्री आणि नेत्यांनी धार्मिक कार्यापासून दूर राहिले पाहिजे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणे हे समाजासाठी घातक आहे. जिथे राजकारणी जातात तिथे ते आग लावल्याशिवाय निघत नाहीत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेटच सुनावले आहे. नागपूरमधील महानुभाव पंथ परिषदेत बोलताना त्यांनी धर्म, समाज आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा स्पष्ट केल्या.
गडकरी म्हणाले की, “धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य ही तीन स्वतंत्र क्षेत्रे आहेत. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. काही राजकारणी त्याचा वापर करून समाजाला भडकवतात. त्यामुळे विकास, रोजगार यांसारखे प्रश्न दुय्यम ठरतात.”

गडकरींनी महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामींच्या शिकवणीचा उल्लेख करताना सांगितले की सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता ही मूल्ये समाजासाठी आधारस्तंभ आहेत. “जीवनात सत्याचे पालन करा, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता जोपासा. कोणालाही दुखावू नका. ही मूल्ये समाजात टिकवली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल,” असे ते म्हणाले.

Manoj Jarange : आजपासून पाणी त्याग; कडक उपोषणावर जरांगे ठाम !

राजकारणातील वास्तवावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, “राजकारणात जो लोकांना सर्वोत्तम मूर्ख बनवतो, तोच सर्वोत्तम नेता ठरतो. बोलणे सोपे आहे, पण करणे कठीण आहे. मी अधिकारी नाही, पण मला अनुभव आहे की अनेकदा सत्य बोलण्याला मनाई असते.”

Maratha movement : कायद्याच्या चौकटीतच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार !

“शॉर्टकट घेतल्याने ध्येय साध्य होत नाही. जसे लाल सिग्नल तोडणे सोपे आहे, पण त्यामुळे अपूर्णता निर्माण होते. शॉर्टकट तुमचं मूल्य कमी करतात,” असे गडकरी म्हणाले. गडकरींच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा स्पष्ट झाले आहे की ते सत्तेत असूनही राजकारणातील चुकीच्या प्रवृत्तीवर वारंवार खडे बोल सुनावतात त्यामुळेच त्यांची वक्तव्य कायम चर्चेत असतात.

____

error: Content is protected !!