Union ministers hit the campaign trail for Mahayuti candidates : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरले मैदानात
Nagpur जगात चांगले आहे, ते नागपुरात आले पाहिजे, यासाठी प्रयत्न आहे. विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. नागपूरच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आतापर्यंत विकासाचा पार्ट-वन झाला, आता पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सज्ज व्हावे. त्यासाठी जनतेने मतांच्या रुपात महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रभाग क्रमांक ३७ मधील महायुतीचे उमेदवार निधी तेलगोटे, प्रा. दिलीप दिवे, अश्विनी जिचकार आणि संजय उगले यांच्या प्रचारार्थ राधे मंगलम येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक व विविध परिवार संस्था संवाद बैठकीत ते बोलत होते. त्याचवेळी प्रभाग क्रमांक ३८ मधील आनंद नितनवरे, प्रतिभा राऊत, माहेश्वरी पटले, प्रभाग ३५ मधील संदीप गवई, पूजा भुगावकर, विशाखा मोहोड, रमेश भंडारी, प्रभाग ३६मधील अमोल श्यामकुळे, माया हाडे, शिवानी दाणी, ईश्वर ढेंगळे तसेच प्रभाग २८ मधील विजय झलके, नंदा येवले, नीता ठाकरे, किरण दातीर यांच्या प्रचारार्थ देखील गडकरी यांनी संवाद साधला.
Municipal Election : महापालिकेत वर्चस्वासाठी मित्र पक्षांमध्येच चूरस!
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडकरी मैदानात उतरले. एकाच दिवशी पाच बैठका आणि तीन जाहीर सभा घेऊन गडकरींनी माहोल केला.
शहरातील प्रत्येकाला सर्वोत्तम नगरी सुविधा मिळाव्यात, नागपूरचा सुखांक मोठा व्हावा हीच माझी इच्छा आहे. स्थिर नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि विकासाची गती कायम ठेवायची असेल तर येणाऱ्या महायुतीला मत द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
Municipal Election : ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ संकल्पना भारी, प्रसिद्धी जोरदार
महानगरपालिकेच्या कारभाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ई-टेंडरिंग, ऑनलाईन सेवा आणि थेट लाभ हस्तांतरण यामुळे महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. उत्तम दळणवळण सेवा नागपुरात आहे. करदात्याच्या पैशाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे हा भाजपचा कायमचा आग्रह राहिला आहे.








