Pawar Vs Padalkar : ‘रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा’, पडळकरांचा पलटवार

Gopichand Padalkar says Rohit Pawar is like Aurangzeb mindset : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलं बाळ लोकांमध्ये कधी जाणार?

Solapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये झालेल्या अपहरणाच्या प्रकरणानंतर आरोप – प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. सांगलीतील वाळव्यात झालेल्या कार्यक्रमात रोहित पवारांनी पडळकरांवर ‘डुप्लिकेट सोनं’ अशी टीका केली होती. त्यावर आता पडळकरांनी जोरदार पलटवार केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, डुप्लिकेटपणा हा पवारांमध्ये ठासून भरलेला आहे. रोहित पवार हा आज्या वरती गेला आहे. आजोबांनी गेली पन्नास वर्ष सोनं म्हणून पितळ विकलं आहे. रोहित पवार स्वतः पोस्टल मतावर निवडून आला आहे, हे कालच अजित पवारांनी सांगितलं. माझ्याविषयी त्याने काय म्हटलं त्याला काही किंमत नाही. मात्र, मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते. कारण रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे.

CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !

पडळकरांनी औरंगजेबाची उपमा देत आरोप केला की, औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला होता. त्याचप्रमाणे रोहित पवार देखील अजित पवारांच्या मुलांबरोबर असाच खेळ करू शकतो, अशी मला भीती आहे. पडळकर म्हणाले, वमला काही चिंता नाही. मी पवारांना उलटा पुलटा करून पुरून उरलो आहे. मात्र, रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करणं गरजेचं आहे. तो सरकारच्या नाकात दम आणतोय असं काहीही नाही. मीडियामध्ये बातमी लागली म्हणजे शासन हललं असं होत नाही.

रोहित पवारांवर टीका करताना पडळकर म्हणाले, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला हा बाळ लोकांमध्ये कधी जाणार? गावकरी विचारतात हा गावात कधी दिसणार? हा पिगुच्या कोंबडीसारखा आहे. स्वतःचा मतदारसंघ शाबूत ठेवावा, पोस्टल मतावर निवडून आला हे लक्षात ठेवावं. पुढच्या निवडणुकीत स्वतःच हरतील.

Fraud case : बावनकुळे यांचे नाव वापरत ‘क्यूआर’ पाठवला !

भविष्यात रोहित पवारांवर मोठा धोका येईल असा इशारा देत पडळकर म्हणाले, महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीत स्वतःची आमदारकी घालवून बसाल. आम्ही पूर्ण क्षमतेने त्यांच्या विरोधात काम करू.