व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !

CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !

Undisputed majority, NDA striving for unopposed election : निर्विवाद बहुमत, एनडीए बिनविरोध निवडीसाठी प्रयत्नशील

New Delhi : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.

सी. पी. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून त्यांचं राजकीय जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघातून सुरू झालं. त्यांनी 1998 आणि 1999 मध्ये कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 2003 ते 2006 दरम्यान ते भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी झारखंडचे राज्यपाल, तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार, तसेच पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

Election Commission of India : आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी, ना कुणी विरोधक !

मागील निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती बनवलं होतं. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरले आहेत. एनडीएकडे सध्या 427 खासदारांचं संख्याबळ आहे, जे बहुमताच्या 392 या आकड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. मात्र, इंडिया आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. एनडीए बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत.आता लक्ष लागले आहे ते इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण ठरणार यावर आणि महाराष्ट्राच्या रिक्त होणाऱ्या राज्यपालपदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणाची नियुक्ती करतात यावर.

Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंनी कोल्हापूरात नवा इतिहास लिहीला !

एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव जाहीर झालं आहे. सी. पी. राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, ते वादग्रस्त नाहीत. त्यांना राजकारण आणि संघटनेचा अनुभव आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

error: Content is protected !!