Plane crash investigation : बारामतीतील धक्कादायक विमान अपघाताची अखेर चौकशी सुरू!

After CM demand Central Investigation Agency took up matter : मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर केंद्रीय तपास संस्थेने सूत्र घेतले हाती

Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय संस्थेकडून करण्यात येणार आहे. एएआयबी म्हणजेच विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेच्या वतीने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही संस्था राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी या संदर्भातील पत्र नुकतेच केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पाठवले होते. केंद्रीय मंत्र्यांनी या पत्राचे तात्काळ दखल घेऊन तपासाचे आदेश दिले असून त्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. विमान अपघात तपास ब्युरो या घटनेचा सखोल तपास करत असून अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. तपास यंत्रणेने तो ताब्यात घेतला आहे. अपघात कसा घडला नियम पाळले गेले आहेत का यासंदर्भात पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने हा तपास केला जाणार आहे.

Death Threat to Former MP Navneet Rana : एक आठवड्यानंतर पोलीस रिकाम्या हाताने परतले

अपघाताच्या संदर्भातील सगळा तांत्रिक रेकॉर्ड, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी उड्डाण मंत्रालयाने आपल्या पत्राची दखल घेतली असून, चौकशी अहवाल येतात त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल स्थानिक प्रशासनाची यादी मदत लागेल हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारला ही आम्ही देऊ असे स्पष्टीकरण मंत्रालयाने दिले आहे.

Ajit Pawar death news : मातृतीर्थ पोरके! सिंदखेडराजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत तळमळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात चौकशी संदर्भात लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले की, अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह यात आणखी 4 जणांना यात प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच भविष्यातील असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पावले उचलण्यात यावी, अशीही पत्रातून मागणी केली होती.

___