Relief under Pradhan Mantri Awas Yojana to 1,283 ineligible beneficiaries in Akola : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, नियमांमध्ये आवश्यक शिथिलता देण्याचे संकेत
Akola महानगरपालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी-१) अंतर्गत अपात्र ठरलेल्या १२८३ लाभार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात सन २०१७ पासून ही योजना राबविण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ६४ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ७६४० अर्जांना मंजुरी मिळाली, तर ४६१९ प्रस्ताव शासनाने नाकारले होते. यातील ३३३६ प्रस्ताव शासन निर्णयानुसार पात्र ठरले असतानाही, ३१ डिसेंबर २०२३ नंतर १२८३ लाभार्थी अद्यापही अपात्र राहिले आहेत.
Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न
या लाभार्थ्यांना जागेचा मालकी हक्क, उत्पन्न मर्यादा तसेच चटई क्षेत्राशी संबंधित किरकोळ त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. या अडचणी दूर करून संबंधितांना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत संबंधित नियमांमध्ये आवश्यक शिथिलता देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या १२८३ लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
MLA Nitin Deshmukh : अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा आमदाराला फटका, सभा तहकूब करण्याची वेळ
काय आहेत प्रमुख मागण्या?
उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ४.५ लाख रुपयांपर्यंत वाढविणे
चटई क्षेत्र २१ चौरस मीटरपर्यंत शिथिल करणे
शासकीय जागेच्या मालकी हक्कातील गुंतागुंत कमी करून लाभार्थ्यांना सुलभ मालकी हक्क प्रदान करणे
या निर्णयामुळे शहरातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








