Breaking

PM Narendra Modi : पिक कर्ज व्याज सवलत योजना आता ५ लाखापर्यंत!

Crop loan interest concession scheme now up to 5 lakhs : पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद, वित्तीय ताण कमी होण्याचा विश्वास

Yavatmal केंद्र सरकारद्वारा नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टींची घोषणा केली. पिक कर्ज व इतर विषयांवरील तरतुदींच्या माहितीसाठी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘कृषि आणी ग्रामीण समृद्धी’ Agriculture and Rural Prosperity या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या संवादात सहभाग घेतला.

वेबिनारला जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेबिनारला उद्देशून शेतकऱ्यांशी सवांद साधला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी संस्थात्मक पतपुरवठाचे महत्त्व सांगितले.

Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!

भारत सरकारद्वारे २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून पात्र केसीसी धारकांना कर्ज व्याज सवलत योजना वाढीव मर्यादा ३ लाखावरून ५ लाख करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांवरील वित्तीय ताण कमी होण्यास मदत होईल. ही योजना पिक कर्ज, फलोत्पादन, पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. तसेच भारतीय रिजर्व बँकेद्वारा शेती कर्जासाठी बिना तारण कर्ज मर्यादा १ लाख ६० हजारावरुन २ लाखापर्यंत करण्यात आलेली आहे.

Sajid Khan Pathan : रुग्णालयाच्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम सभागृहात गाजणार

वेबिनारला जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधव व इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण दुधे, निशिकांत ठाकरे, योगेश निलखान, अविनाश महाजन, प्रसंजीत डोंगरे, मनोज राठोड व ईतर जिल्हा बँक समन्वयकयांचे सहकार्य लाभले.