PMC election : भाजपचा धाडसी प्रयोग; तरुण आणि महिलांना प्राधान्य

Tickets of 42 sitting corporators, including relatives of MLAs MPs cut. : आमदार-खासदारांच्या नातेवाइकांसह ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले

Pune : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात भाजपने उमेदवार निवडीत मोठा आणि धाडसी बदल करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा भाजपने घराणेशाहीला स्पष्टपणे लगाम घालत निम्म्याहून अधिक विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली असून एकूण ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आहे. यामध्ये काही आमदार आणि खासदारांच्या मुलांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षातील अंतर्गत समीकरणे चर्चेचा विषय ठरली आहेत.

भाजपकडून यंदा उमेदवारी जाहीर करताना तरुण, नवखे आणि महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरक्षित जागांसह खुल्या प्रवर्गातील जागांवरही महिलांना प्राधान्य देत विरोधी पक्षांमधील पुरुष उमेदवारांसमोर थेट आव्हान उभे करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या निर्णयामागे संघटनात्मक बळकटीकरण, नव्या नेतृत्वाची उभारणी आणि जनतेत बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Akola Municipal Corporation Election : भाजप–राष्ट्रवादी युती, शिवसेना चर्चेतून बाहेर

पुणे शहरात अनेक वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या आणि पुन्हा तिकीट मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या अनेक नेत्यांना यंदा घरी बसवण्यात आले आहे. ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुब शेख, श्वेता गलांडे-खोसे, मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळंबकर, अमोल बालवडकर, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरियार, आरती कोंढरे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, संजय घुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंडगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले आणि दिशा माने या विद्यमान नगरसेवकांना पक्षाने यंदा उमेदवारी नाकारली आहे.

Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड!

तिकीट नाकारल्यामुळे भाजपमधील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून काहींनी तर इतर पक्षांकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचेही चित्र समोर आले आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाने या सर्व प्रतिक्रिया दुर्लक्षित करत संघटनात्मक शिस्त आणि दीर्घकालीन राजकीय धोरणावर भर दिल्याचे दिसून येते.

तरुण नेतृत्वाला पुढे आणणे, महिलांना निर्णायक भूमिका देणे आणि घराणेशाहीविरोधात ठोस भूमिका घेणे, या त्रिसूत्रीवर भाजपने पुण्यातील उमेदवारी आखल्याचे स्पष्ट झाले आहे. हा नवा प्रयोग मतदारांना कितपत भावतो आणि त्याचा निकालावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

__