Political Innovation : आपचं अजब घोषणापत्र; ‘भ्रष्टाचार करणार नाही’ हे ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिलं

AAP submits ₹500 stamp-paper affidavit promising ‘no corruption’ : निवडून आल्यावर पक्ष न सोडण्याचीही हमी; राजर्षी शाहू आघाडीच्या प्रयोगामुळे कोल्हापुरात चुरस वाढली

Kolhapur कोल्हापूर महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) प्रचाराची एक अनोखी आणि ऐतिहासिक पद्धत अवलंबली आहे. निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही आणि पक्ष सोडून इतरत्र जाणार नाही, अशी लेखी ग्वाही ‘आप’च्या उमेदवारांनी चक्क ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मतदारांना दिली आहे. राजकारण्यांच्या आश्वासनांवर मतदारांचा विश्वास उडत चालला असल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘आप’चा हा स्टॅम्प पेपर पॅटर्न सध्या कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत कंत्राटदारांकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. हे लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने ‘भ्रष्टाचार मुक्त कारभार’ करण्याचे वचन दिले आहे. उमेदवारांनी या प्रतिज्ञापत्रात तीन मुख्य गोष्टी नमूद केल्या आहेत. निवडून आल्यावर कोणत्याही भ्रष्टाचारात सहभागी होणार नाही. निकालानंतर कोणत्याही तडजोडीच्या राजकारणात पडणार नाही किंवा पक्ष सोडणार नाही. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कामासाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याची हमी. हे प्रतिज्ञापत्र प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उमेदवारांनी केला असून, यामुळे परंपरागत राजकीय पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

fake certificate :‘दिव्यांग’ असल्याचा पुरावा कुठे? यूडीआयडी न दिल्याने संशय वाढला

कोल्हापुरात यावेळी केवळ महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोनच टोके नसून, ‘राजर्षी शाहू आघाडी’ या तिसऱ्या पर्यायाने निवडणुकीत रंगत आणली आहे. इंडिया आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डावलल्या गेल्याने हा नवा प्रयोग आकारास आला आहे. या आघाडीत आम आदमी पक्ष (१४ उमेदवार), शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (२३ उमेदवार) आणि वंचित बहुजन आघाडी (७ उमेदवार) एकत्र आले आहेत. प्रस्थापित राजकीय गटांना टक्कर देण्यासाठी या तिसऱ्या आघाडीने कोल्हापूरच्या राजकारणात आपली ताकद झोकून दिली आहे.

Thackeray Brothers united : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा; भाजपच्या निवडणूक रणनीतीवर साधला निशाणा

निवडणुकीनंतर अनेकदा नगरसेवक पक्षांतर करतात किंवा सत्तेसाठी तडजोड करतात, असा अनुभव मतदारांना येतो. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ही हमी लिहून दिल्याने मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ‘आप’ने केला आहे. कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच नवीन प्रयोग केले जातात, मात्र ‘आप’चा हा कायदेशीर स्वरूपातील आश्वासनाचा प्रयोग मतदारांच्या पसंतीस उतरतो का, हे निकालातून स्पष्ट होईल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात या राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांची ही ‘गॅरंटी’ किती प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.