Breaking

Prakash Ambedkar on Pune Swargate Rape Case : योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

Remove Yogesh Kadam from the cabinet : स्वारगेट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Akola पुणे स्वारगेट बसस्थानकातील संतापजनक घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत विचारलेला “ती पीडित तरुणी ओरडली का नाही?” हा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विधानावरून कदमांना जोरदार विरोध होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “योगेश कदम यांचे वक्तव्य हे असंवेदनशील आहे. महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था लकवाग्रस्त झाली आहे. गृहराज्यमंत्रीच असे विधान करत असतील, तर पोलिस आणि आरोपींनाही त्यातून बळ मिळते. अशा व्यक्तीला मंत्रीपदावर ठेवणे योग्य नाही.”

Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!

प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत विचारले की, “योगेश कदम यांच्यासारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवले आहे? त्यांच्या असंवेदनशीलतेमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कदम यांची तात्काळ हकालपट्टी करतील का?”

आंबेडकरांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ देत सांगितले की, “बाबरी मशिदीच्या प्रकरणात किंवा शीख दंगलीच्या वेळी सामान्य जनतेचे नुकसान झाले. तेव्हा त्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सरकार संवेदनशीलता दाखवण्यास तयार नाही.”

सरपंच देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, “या प्रकरणात १,५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु, नीरव मोदी प्रकरणात इंग्लंडच्या कोर्टाने भारतीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. चौकशी PhD सारखी लांबणीवर टाकण्याचा प्रकार का?”

Amravati Congress : काँग्रेस पोहोचली थेट आयुक्तांच्या कक्षात!

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, “मुंबई उच्च न्यायालयात १८ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणीतील विसंगतीबाबत सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले की नाही, हे महत्त्वाचे ठरेल.”