Prataprao Jadhav : ‘भावी खासदार’च्या पोस्टरने प्रतापरावांची वाढवली चिंता!

minister-prataprao-jadhav-in-worry-as-future-mp-posters-appeared-shashikant-khedekar : वर्चस्वाला धक्का बसण्याची भीती, शिंदेसेनेत नवे राजकीय समीकरण

Buldhana “राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,” या उक्तीची प्रचिती सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या राजकारणात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘भावी खासदार’ मोहिमेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात सलग तीन वेळा आमदारकी आणि एकदा खासदारकी मिळवत प्रतापराव जाधव यांनी दीर्घकाळ आपले भक्कम वर्चस्व निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिंदेसेनेची ताकद वाढली आणि पक्षाच्या राजकारणात त्यांचा प्रभाव निर्णायक मानला जात राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदेसेनेचे राजकारण मोठ्या प्रमाणात त्यांच्या भोवतीच फिरत असल्याचे चित्र होते.

MLA siddharth kharat : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी, तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

मात्र आता या वर्चस्वाला पक्षांतर्गतच काही प्रमाणात आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंदखेडराजाचे माजी आमदार शशीकांत खेडेकर यांचे नावही या चर्चेत पुढे येऊ लागले आहे. त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर ‘भावी खासदार शशिकांत खेडेकर’ अशा आशयाच्या पोस्ट्स आणि प्रचार मोहिमा सुरू झाल्याचे दिसत आहे.
या मोहिमेमागे नेमकी कोणती राजकीय रणनीती आहे, तसेच या हालचालींना खेडेकर यांची मूक संमती आहे का, याबाबत सध्या स्पष्टता नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली राजकीय चाचपणी असू शकते, तर काही जण याकडे शिंदेसेनेतील संभाव्य गटबाजीच्या संकेतांप्रमाणे पाहत आहेत

Malkapur Municipal Council : नगरसेवकाने स्वतःच गोळा केला प्रभागातील कचरा!

दरम्यान, ‘भावी खासदार’च्या या सोशल मीडिया मोहिमेमुळे जिल्ह्यातील शिंदेसेनेतील समीकरणे खरोखर बदलणार का, की हा केवळ समर्थकांकडून सुरू झालेला राजकीय प्रयोग आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात पक्षांतर्गत हालचाली कोणते वळण घेतात, यावरच या चर्चेचे भवितव्य ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.