व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pratibha Dhanorkar : चंद्रपुरात राजशिष्टाचाराचा धुराळा; खासदार प्रतिभा धानोरकरांचे भर कार्यक्रमातून ‘वॉकआऊट’,...

Pratibha Dhanorkar : चंद्रपुरात राजशिष्टाचाराचा धुराळा; खासदार प्रतिभा धानोरकरांचे भर कार्यक्रमातून ‘वॉकआऊट’, प्रकरण थेट दिल्लीत

MP Pratibha Dhanorkar Walks Out from Rajmata Rani Hirai Mahotsav Mid-Event : घटनेनंतर राजकीय क्षेत्रात दोन गट, प्रशासनाने अपमान केल्याची तक्रार

Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘हिराई महोत्सवाच्या’ उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा राडा झाला असून काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘वॉकआऊट’मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कार्यकर्त्यांचे सत्कार सुरू असल्याने आणि शासकीय व्यासपीठावर राजकीय रंग चढल्याचा आरोप करत खासदार धानोरकर यांनी सुरुवातीलाच संताप व्यक्त केला होता. मात्र, वादाची मुख्य ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा धानोरकर यांच्या भाषणानंतर सुधीर मुनगंटीवार भाषणासाठी उभे राहिले. यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेत राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचा दावा केला. “खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्र्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे,” असे प्रशासनाला सुनावत त्यांनी संतप्त अवस्थेत थेट मंचावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Ashok uikey : राळेगाव प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई होणार

या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात दोन गट पडले असून, काहींनी या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. “सार्वजनिक व्यासपीठावर असे वर्तन करणे जनतेसमोर चुकीचा संदेश देणारे आहे,” अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. दुसरीकडे, प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असून विशेषाधिकार भंगाची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने एका महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील आधीच गुंतागुंतीचे असलेले राजकीय समीकरण या घटनेमुळे अधिकच चिघळले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!