व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prithviraj Chavan: पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात काहीतरी...

Prithviraj Chavan: पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात काहीतरी शिजतंय?

Pruthviraj chavan claims of different equestions in Maharashtra politics : भाजपमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा दावा

Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट सध्या देशाच्या राजकारणात मोठी चर्चा आणि खळबळ उडवून देणारी ठरली आहे. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी राजकारणात काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे दिले आहेत.

भाजपमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असून, कदाचित याच राजकीय घडामोडींचा हा भाग असावा, असा दावा त्यांनी केला आहे.

कोर्टाच्या एका कार्यक्रमासाठी नागपूर येथे आलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकारणातील या पडद्यामागच्या हालचालींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अशा भेटीगाठी राजकारणात सतत चालत असतात. काही भेटी उघडपणे होतात तर काही घडामोडी गुप्तपणे पार पडतात, हा राजकारणाचाच एक भाग आहे. शरद पवार यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमक्या कशासाठी भेटले, याबद्दल आपल्याकडे खात्रीशीर माहिती नसली तरी, यापूर्वी शरद पवार यांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तर कधी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी भेटल्याचे सांगितले होते. आताही त्यांच्या खासदारांनी शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी भेटल्याचे सांगितले; मात्र भेटीनंतर महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केल्याचे समोर आले. या बदलत्या कारणांमुळे नेमके काय शिजतंय, याबाबत शंका निर्माण होते.

Nirmal Ujjwal Society : ठेवीदारांच्या लुटमारीवर पोलीस महासंचालक दरबारात धाव; निर्मल उज्ज्वलचे पाय खोलात

यावेळी चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्याची भीती सर्वांनाच सतावत आहे. आमच्यासोबत पूर्वी असलेले माझे काही मित्र आता भाजपमध्ये आहेत, आणि त्यांच्याच माहितीनुसार, भाजपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. याच दबावापोटी किंवा घडामोडींमुळे हे नेते पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेले असावेत, असा सूचक संशय त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे, मागील पंधरा दिवसांत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अनुक्रमे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. विशेषतः नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देशाचे वातावरण तापले असताना झालेल्या या गाठीभेटी आणि आता थेट सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आठ खासदारांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!