Shocking act of controversial Pooja Khedkar family : वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा
Pune : वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक खतरनाक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटीस देण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कुत्रे सोडण्यात आले, तर घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आली.
नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित या प्रकरणात, दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक चालकाच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला खेडकर यांच्या घरी आणले होते. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींचा मागोवा लागताच, त्यांनी खेडकर यांच्या घरी धाव घेतली. मात्र, आरोपीला पळवून लावण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
Crime news : माजी सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास दणका !
या घटनेनंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे व आरोपींना मदत केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
Rajkumar Patel : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे नाव अपहरण प्रकरणात समोर आले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पूजा ok खेडकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सतत चर्चेत असून, प्रकरणातून नवे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
_____








