Rain alert : राज्यात कोसळधार! 10 लाख एकर शेती पाण्याखाली,

Panchnama in two days, Ajitdada in the war room ; पंचनामे दोन दिवसात, अजितदादा वॉर रूममध्य !

Mumbai : राज्यात तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावं जलमय झाली आहेत, तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि उपनगरांना येत्या 12 तासांत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पूरस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीच्या उपाययोजनां बाबत सूचना दिल्या आहेत. मिठी नदीची पाणीपातळी वाढत चालल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी बोटींचा वापर केला जात आहे.

Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमवरून बावनकुळेंचा काँग्रेसला आणखी एक सल्ला !

राज्यातील घाटमाथ्यावरही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, तसेच मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर असून पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. जनावरे वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रत्नागिरी, खेड, चिपळून या भागांमध्ये पाण्याची धोक्याची पातळी वाढली असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

अजित पवार यांनी सांगितले, दोन दिवसांत पंचनाम्याचे काम सुरू केले जाईल. पुराचा व पावसाचा फटका बसलेल्या गावांमध्ये तातडीने मदत पोहोचवली जात आहे. जलसंपदा विभागाला धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरनियंत्रणासाठी प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पावसामुळे काही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून शेजारच्या राज्यांचीही मदत घेण्यात येत आहे. त्यांनी खाली पाणी सोडलं नाही तर राज्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

Nitin Raut : काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत यांचा फडणवीसांना पाठिंबा !

सरकारकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाची आणि हवामानाची सतत माहिती घेतली जात आहे. बाधितांना तातडीने मदत पोहोचवली जात असून प्रशासन सज्ज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. “राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये, परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.