Ramdas Athavale offers Abhijit dipke to join RPI : दीपके यांनी उभारलेले आंदोलन भरकटू नये, यासाठी आरपीआयचा प्रस्ताव
Nagpur पेपरफुटीविरोधात आक्रमक आंदोलन उभारणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटात सहभागी व्हावे, अशी थेट ऑफर केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिली आहे.
अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्याच मोठ्या आंदोलनाला मोठे यश मिळाले होते. पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे घराघरांत उद्रेक निर्माण झाला होता. दीपके यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात अत्यंत कडक कायदा केला असून, त्यात १० वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार भविष्यात एकही पेपर लीक होऊ नये यासाठी ‘प्रूल-प्रूफ’ व्यवस्था निर्माण करत असून, दीपके यांच्या जवळपास सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
Mallikarjun Kharge : खरगे यांच्या सभेच्या मंचाच्या शुद्धीकरणाचा काँग्रेसकडून निषेध
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, सरकारने कडक कायदा केला असला तरी पळवाटा शोधून कायदे तोडणारे लोक समाजात असतात. आमचा प्रयत्न पेपरफुटी पूर्णपणे थांबवण्याचा आहे. दीपके यांनी उभारलेले आंदोलन आता भरकटू नये, यासाठी त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश करावा.
अभिजित दीपके यांनी आरपीआय किंवा सरकारमध्ये सहभाग घेतल्यास त्यांच्या इतर मागण्या मान्य केल्या जातील का, या प्रश्नावर आठवले यांनी स्पष्ट केले की, ज्या मागण्या समाजाच्या फायद्याच्या आणि लोकहिताच्या असतील, त्याला सरकारचा नेहमीच सकारात्मक प्रतिसाद असतो.पेपरफुटी आंदोलनामुळे बॅकफूटवर आलेल्या केंद्र सरकारने आता कायदा करून तोडगा काढला असला, तरी या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या दीपके यांना आपल्या पक्षात खेचून आठवले राजकीय गणितं जुळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.








