Nitesh Ranes response to Waris Pathans threat : वारीस पठाण यांच्या धमकीला नितेश राणेंचे प्रत्युत्तर
Mumbai: एमआयएमच्या सभेत वारीस पठाण यांनी दिलेल्या धमकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हिंदुत्ववादी सरकार आहे. जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला, तर सरकारला देखील विचार करावा लागेल की सभा होऊ द्यायच्या की नाही,” असे राणे म्हणाले.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत, वारीस पठाण यांनी नितेश राणेंना “येशील दोन पायावर, जाशील स्ट्रेचरवर” अशी धमकी दिली होती. यावर पलटवार करत राणे म्हणाले, “कालची सभा अहमदनगरमध्ये नव्हती, अहिल्यानगरमध्ये झाली. अहिल्यानगरचं नाव घ्यायलाही तयार नाही. औरंगाबादचं संभाजीनगर केलंय ते मान्य नाही. हे काय पाकिस्तान आहे का? शरीया चालतोय का इथे?”
राणे पुढे म्हणाले, “भौकनेवाले कुते काटते नही. हिरव्या सापांची वळवळ होत आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला, तर सरकारला बघावं लागेल की अशा सभांना परवानगी द्यायची की नाही. हिंदुत्ववादी सरकार आहे, सहनशीलतेचा अंत झाला तर आम्हालाही तिसरा डोळा उघडावा लागेल.”
राणे म्हणाले, “पैगंबर कुराणावर बोललं तर वळवळतात, पण आमच्या देवींचे हात तोडतात तेव्हा आम्ही काही बोलायचं नाही का? ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर लावतात, धमकावतात. आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला लावू नका. खरा सनातनी हिंदू म्हणजे आंबेडकरांना मानणारा. शिवशक्ती आणि भीमशक्तीवर विश्वास ठेवणारा. पण हे लोक आंबेडकरांना मानत नाहीत, शरीया आणायचा प्रयत्न करत आहेत.”
त्यांनी आणखी स्पष्ट इशारा देत म्हटलं “हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून पैजाम्याचे नाडे कसे ढिले करायचे हे आम्हाला माहिती आहे. रझाकारांच्या इतिहासावर बोललात, तर आमचं तोंड उघडायला लावू नका.”
Municipal Corporation : आमदार प्रवीण दटके यांनी आणले सफाई कामगारांच्या जीवनात नवचैतन्य !
वारीस पठाण यांच्या आव्हानावर नितेश राणे म्हणाले, “जागा आणि वेळ कळवा, किंवा मस्जिद निवडा, पण धमक्या देऊ नका. तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. आमचं सरकार सभेची परवानगी देते म्हणून बोलता, नाहीतर मस्जिदीच्या भोंग्यातून बोलावं लागलं असतं. मूर्तीची विटंबना केली तेव्हा एमआयएमने निषेध का नोंदवला नाही?”
राणे पुढे म्हणाले, “वेगळा शरीया कायदा आणायचा, आणि आम्हाला धमक्या द्यायच्या? आता यांना हैदराबादमार्गे पाकिस्तानात पाठवावं लागेल. आम्ही सर्व मुस्लीमांविरोधात नाही, पण गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या विरोधात नक्की आहोत.”
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी मंजूर !
“‘आय लव्ह मोहम्मद’ म्हणत असाल, तर ‘हर हर महादेव’ देखील बोला. हिंदू धर्म विशाल आहे, सगळ्यांना सामावून घेणारा आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊ नका,” असा इशाराही राणेंनी दिला.
दरम्यान, वारीस पठाण यांनी सभेत भाजपवर द्वेष पसरवल्याचा आरोप केला आणि नितेश राणेंना ‘नेपाळी’ म्हणत टीका केली. त्यांनी म्हटलं, “मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असं म्हणणारे नितेश राणे यांना महाराष्ट्रातील जनता योग्य उत्तर देईल.” राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, या शब्दयुद्धामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.
_____








