Mahamorcha to get reservation from ST : एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी महामोर्चा
Bheed / jalana : राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. बीड आणि जालन्यात बंजारांचा मोठा महामोर्चा काढण्यात आला असून, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोरदारपणे पुढे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समाजाच्या हजारो बांधवांनी आपली ताकद दाखवली.
हैदराबाद गॅझेटियरचा दाखला देऊन सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले आणि त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. त्याचप्रमाणे बंजारा समाजानेही गॅझेटियर नोंदीचा दाखला देत, एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी आक्रमकपणे मांडली आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बंजारांच्या मोर्चामुळे हलली आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे, सुरेश धस, विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्ह्यातील सहा आमदारांनी बंजारांच्या मागणीसोबत उभं राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. एवढेच नाही तर भाजप नेत्या पंकजा मुंडेही मोर्चात सहभागी झाल्या.
Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !
बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या तब्बल अडीच लाख आहे, तर 1.90 लाखांहून अधिक मतदार आहेत. फक्त गेवराई विधानसभा मतदारसंघातच समाजाचे 63 हजार मतदार आहेत. परळी आणि माजलगाव मतदारसंघात मिळून 70 हजारांहून अधिक मतदारसंख्या असून, त्यामुळे स्थानिक निवडणुकांपासून विधानसभेपर्यंत बंजारा समाज निर्णायक ठरत आहे.
जिल्ह्यात 1286 लमाण तांडे असून, त्यांची संघटनशक्ती मोठ्या ताकदीची मानली जाते. याच प्रभावामुळे कोणताही पक्ष समाजाला नाराज करण्याची हिंमत दाखवू शकत नाही.
Crime news : माजी सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास दणका !
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. आता बंजारा समाजाचा मोर्चा तसाच प्रभाव निर्माण करत असल्याचे दिसते. बीडसह जालन्यात काढलेल्या मोर्चामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पुढील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
बंजारांचा हा महामोर्चा म्हणजे राजकीय पक्षांसाठी एक मोठं आव्हान ठरलं असून, एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला आता प्रचंड गती मिळाली आहे.
____