Chhagan Bhujbal’s question to educated Marathas : छगन भुजबळ यांचा शिकलेल्या मराठ्यांना सवाल
Mumbai : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजासमोर एक नवे आव्हान ठेवले आहे. त्यांनी शिकलेल्या मराठ्यांना थेट प्रश्न केला आहे की, मराठा समाजाने आतापर्यंत मिळत आलेले आरक्षण पूर्णपणे सोडून फक्त ओबीसीमधूनच आरक्षण घ्यायचे का?
भुजबळ म्हणाले, “मराठा समाज आधीपासून खुल्या प्रवर्गातील 50 टक्क्यांमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिले, त्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त मराठे आहेत. राज्य सरकारने याशिवाय 10 टक्के स्वतंत्र आरक्षणही दिले. तरी आता मराठा समाजाला फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे का? मग तुम्हाला ईडब्ल्यूएस नको, राज्याचे 10 टक्के नको आणि खुला प्रवर्गही नको, हे शिकलेल्या मराठा नेत्यांनी जाहीरपणे सांगावे.
Ajit Pawar : राष्ट्रवादीने बांधली असंघटीत कामगार आणि अल्पसंख्यांकाची मोट !
लातूरमध्ये ओबीसी आरक्षण संपल्यामुळे आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देण्यापूर्वी भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ईडब्ल्यूएस आरक्षणात मराठा समाजाचा वाटा 80 ते 90 टक्के आहे. खुल्या प्रवर्गातही जवळपास निम्मे मराठे आहेत. तरीदेखील फक्त ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे मला शिकलेल्या, आरक्षणाची समज असलेल्या मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी उत्तर द्यावे. अशिक्षितांपासून मला उत्तराची अपेक्षा नाही.”
Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !
भुजबळ म्हणाले, “एका व्यक्तीच्या बोलण्यावरून राज्यात आंदोलनं पेटतात. पण खरे प्रश्न सोडवण्यासाठी मराठा नेत्यांनी व्होकल व्हायला हवे. समाजाने ठरवावे की, त्यांना आधीपासून असलेले आरक्षण नको आहे आणि फक्त ओबीसी आरक्षणच हवे आहे का?”
___