Reservation controversy : ईडब्ल्यूएस, एसईबीसी अन् आता ओबीसी

How much reservation for a community question of hake : एका समाजाला किती आरक्षण? हाकेंचा सवाल

Beed: राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेलं असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. “ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण द्यायचं?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आगामी काळात महाराष्ट्रभर ओबीसी जोडो अभियान यात्रा काढण्याची घोषणाही केली आहे.

बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना हाके म्हणाले की, “मराठा समाजाला राज्य सरकारने एसईबीसी आरक्षण दिलं, केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसमधून 10% आरक्षण दिलं. म्हणजे एका समाजाला दोन ठिकाणी आरक्षण मिळालं आहे. आता पुन्हा ओबीसी आरक्षणही मागितलं जात आहे. तर मग एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण द्यायचं?”

ATS action: अमरावतीत एटीएसची मोठी कारवाई!

त्यांनी खंत व्यक्त करत सांगितलं की, “गावगाड्यातील ओबीसी घटक सरपंच, नगरसेवक, महापौर होत होते. पण आता ओबीसी आरक्षण संपल्यामुळे ही संधी संपली आहे. तरीही आजवर कोणताही मोठा उठाव झालेला नाही, ही अतिशय वेदनादायक बाब आहे.”

हाके यांनी स्पष्ट केलं की, सणासुदीचा आणि पावसाचा काळ संपल्यानंतर आता राज्यभर ओबीसी जोडो अभियान यात्रा सुरु होईल. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून सुरू होऊन चार ते पाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.

Amol Mitkari : आमदार मिटकरी यांच्या कार्यशैलीवर पदाधिकाऱ्यांचा रोष

“या यात्रेमुळे ओबीसी समाज एकजुटीने उभा राहील आणि आपल्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा एकदा मोठं राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत हाके यांच्या वक्तव्यामुळे मिळत आहेत.