rohini khadse : वि’चित्रा’ताई, २५ दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?

Rohini-khadse-chitra-wagh-word-war-on-lpg-cylinder: रोहिणी खडसेंनी डिवचले, गॅस तुटवड्यावरून राजकारण तापले; चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Mumbai राज्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामान्य नागरिकांना गॅससाठी दिवसन्‌दिवस वाट पाहावी लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना उद्देशून उपरोधिक टिप्पणी केली. “वि‘चित्रा’ ताई, २५ दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?” असा सवाल करत त्यांनी गॅस तुटवड्यामुळे गृहिणींना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा मांडला. घरगुती गॅस मिळण्यासाठी अनेक कुटुंबांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sudhir Mungantiwar : आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याच हवा; सेवा केली नाही तर वेतन कपात करा

“काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. वि’चित्रा’ ताई म्हणाल्या की, सिलिंडर आहेत.. २५ दिवसांत मिळते सिलिंडर.. बुक करायला सांगा… अहो विचित्रा ताई… जर एका सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस, आज संपला असेल तर त्यांनी काय करावं ? २५ दिवस वाट पहावी का ? बरं पाहतो वाट ! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का ? वि’चित्रा’ ताई ?” अशी जहरी टीका रोहिनी खडसे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गॅस बुकिंग केल्यानंतरही काही ठिकाणी सिलेंडर मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय, लहान उद्योग आणि सामान्य कुटुंबे अडचणीत आली असल्याचेही बोलले जात आहे.

Mumbai high court : इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, या समस्येचा संबंध आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी जोडला जात आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस वाहतुकीवर दबाव निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा परिणाम भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काही वृत्तांनुसार, जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याला धोका निर्माण झाल्याने भारतात एलपीजीच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सिलेंडर बुकिंग होत असल्यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे काही भागात तात्पुरता तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

LPG crisis : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

मात्र राज्य सरकारने नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. प्रशासनाने गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले आहे. जिल्हा स्तरावर समित्या तयार करून गॅस वितरणावर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. रोहिणी खडसे यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांनी सरकारने तातडीने उपाययोजना करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.