व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sambhaji Brigade : ‘शेतकरी वाचवा, कर्जमाफी द्या’; नांदुऱ्यात अर्धनग्न आंदोलन

Sambhaji Brigade : ‘शेतकरी वाचवा, कर्जमाफी द्या’; नांदुऱ्यात अर्धनग्न आंदोलन

Shirtless protest in Nandura; Sambhaji Brigade turns aggressive over the demand for farm loan waiver : कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

Nandura शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने नांदुरा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आंदोलकांनी राज्यातील शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडल्याचा आरोप केला.

शेतीसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढून बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करणाऱ्या शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेचा दुहेरी फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून, सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Sanjay Gaikwad, Vijayraj shinde : गायकवाड-शिंदे संघर्ष न्यायालयात; १०० कोटींचा मानहानीचा दावा

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील कृषी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकरी हिताचे निर्णय तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली.

Sindkhedraja APMC : सिंदखेडराजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; सभापतीपदी उमेश शेजूळ बिनविरोध

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, जिल्हा सचिव मंगेश सोळंके, जिल्हाकार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!