Sandip Shelke : एकाने पक्ष सोडल्यामुळे काही फरक पडत नाही!

shivsena-UBT-may-take-action-against-sandip-shelke : संदीप शेळकेंच्या काँग्रेस प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका, कारवाईची तयारी

Buldhana जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली होती. मात्र या घडामोडीनंतर पक्ष गोंधळून न जाता अधिकच सावध आणि सक्रिय झाल्याचे चित्र जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दिसू लागले आहे.

मुंबईतील मातोश्री येथे १४ मार्च रोजी बुलढाणा व मोताळा तालुक्यातील काही सरपंच, माजी सरपंच तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा उद्धवसेनेत पक्षप्रवेश घडवून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे उद्धवसेनेने जिल्ह्यात आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

MLA siddharth kharat : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी, तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

या हालचालीमागे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके यांची रणनीती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एका समन्वयकाच्या निर्गमनामुळे पक्ष कमजोर झाला, असा संदेश जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश घडवून आणून संघटन बळकट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही जाणकारांचे मत आहे.

“एक समन्वयक गेला म्हणून काही फरक पडत नाही, शेकडो कार्यकर्ते पक्षात आणून उत्तर दिले,” असा संदेश या घडामोडीतून देण्याचा प्रयत्न असल्याचेही राजकीय चर्चेत म्हटले जात आहे. या पक्षप्रवेशामुळे उद्धवसेनेने आगामी राजकीय लढतीसाठी तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

Malkapur Municipal Council : नगरसेवकाने स्वतःच गोळा केला प्रभागातील कचरा!

विशेष म्हणजे, या हालचालींकडे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत आपले राजकीय वजन दाखवणारी उद्धवसेना आता जिल्हा परिषदेत कोणते डावपेच आखते, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.