Allegation of Surveillance on Harshvardhan Sapkal : संग्रामपूर काँग्रेसचे सरकारविरोधात निषेध आंदोलन
Sangrampur महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पाळत ठेवून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वरवट-बकाल फाट्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधी घोषणा देत संताप व्यक्त केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला की, मुंबईतील सर्वोदय आश्रमात मुक्कामी असताना हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. साध्या वेशातील पोलिसांना आश्रमात पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली, ही लोकशाहीवर गदा आणणारी हुकूमशाही असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनात शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी व पिकविमा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. कार्यकर्त्यांनी “हुकूमशाही चालणार नाही”, “लोकशाही जिंदाबाद”, “हर्षवर्धन सपकाळ पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत” अशा घोषणा देत सरकारविरोधी एल्गार फुंकला.
Pravin Tayade : बच्चू कडूंनी सत्तेत असताना बंगला बांधला, कारखाना उभारला
आंदोलनात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ पक्ष नेत्या डॉ. स्वाती वाकेकर, प्रदेश सरचिटणीस राम विजय बुरुंगले, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष सतीश टाकळकर, प्रकाश बापू देशमुख, राजेश्वर देशमुख, गणेश टापरे, श्याम डाबरे, प्रा. मोहन रौंदळे, आकाश बोरसे, जाहीर अली, अताऊल्ला पठाण, बळीराम धुळे, गणेश मानखैर, प्रशांत गावंडे, प्रमोद गढे, हरिदास दामधर, राहुल उमाळे, वामनराव बोरसे, श्रीकृष्ण दातार यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.








