Sharad Pawar : काँग्रेसला नकार, ठाकरे-मनसेसोबत युतीचे संकेत !

sharad pawar thackeray brothers alliance bmc polls : शरद पवारांच्या भूमिकेमुळे मुंबईत महापालिका समीकरणे बदलणार

Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याचा प्रस्ताव त्यांनी थेट नाकारला असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंसोबत त्रिकोणी युतीचे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिले आहेत. या हालचालीमुळे मुंबईत काँग्रेस पूर्णपणे एकटी पडण्याच्या स्थितीत आली आहे.

शनिवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्याशी चर्चा करून आघाडी करण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर झाला. भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने “समविचारी कुणासोबतही जायला हरकत नाही,” अशी भूमिका पवार गटाने मांडली.

maveja scam : 73 कोटींच्या घोटाळ्याने महसूल विभागात खळबळ

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांच्या भेटीला जाऊन मुंबईत काँग्रेस – राष्ट्रवादीची संयुक्त लढत व्हावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र काँग्रेसची अट होती “मनसे नको.” या अटीवर पवारांनी सहमती दर्शवली नाही. त्यांनी निर्णय पक्षांतर्गत चर्चेनंतर घेऊ, असे सांगितले होते. आजच्या बैठकीत मात्र पवारांनी मनसेही एक पर्याय आहे असे स्पष्ट करून काँग्रेसच्या युतीला अप्रत्यक्षरित्या नकार दिला.

Mumbai BMC Elections : भाजपनंतर उद्धव सेनेचा डाव; संयुक्त खेळीने शिंदे सेनेला धोबी पछाड !

काँग्रेसमध्ये मनसेबाबत तीव्र मतभेद उफाळले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी सुचवले की, “भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मनसेसोबतही चर्चा होऊ शकते.” मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता थेट फेटाळून लावत स्पष्ट भूमिका घेतली
“मारझोड करणाऱ्या पक्षांसोबत जायचं नाही. उद्धव ठाकरे आपला निर्णय घेतील, पण काँग्रेस मनसेसोबत जाणार नाही.”या विरोधाभासी भूमिकांमुळे काँग्रेसमध्ये गंभीर अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

Local body election : अज्ञातस्थळी गेलेले राष्ट्रवादीचे सहा मुस्लिम उमेदवार परतले !

शरद पवार – उद्धव ठाकरे – राज ठाकरे या संभाव्य आघाडीने मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. या आघाडीत काँग्रेसला स्थान नसेल, हे स्पष्ट आहे. यामुळे काँग्रेसची स्टॅंडअलोन लढत आणि उद्धव – राज – पवार या नव्या समीकरणाची जुळवाजुळव असे चित्र उभे राहिले आहे.

मुंबईत भाजपविरोधी मतांचे विभाजन रोखण्यासाठी हा “ठाकरे–पवार मोर्चा” निर्णायक पाऊल ठरेल का?
काँग्रेसची अडचण वाढेल का? आगामी काही दिवसांत यावर मोठी राजकीय हालचाल होताना दिसेल असे जाणकारांचे मत आहे.

_____