Datta Meghe death : मैत्रीचा ओलावा! दत्ता मेघे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी शरद पवार आज नागपुरात

Sharad Pawar to visit Nagpur by special flight for condolences after Datta Meghe death: राजकारणाच्या पलीकडे जपली मैत्री

Nagpur दानशूर व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातील एक मोठा आधारस्तंभ हरपला आहे. मेघे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार आज, मंगळवारी विशेष विमानाने नागपुरात येत आहेत. राजकीय मतभेद आणि पक्षीय सीमा ओलांडून मैत्री कशी जपली जाते, याचा आदर्शच पवारांच्या या भेटीतून दिसून येत आहे.

शरद पवार मंगळवारी दुपारी ३:३० वाजता विशेष विमानाने मुंबईहून नागपूर विमानतळावर दाखल होतील. विमानतळावरून ते थेट खामला परिसरातील मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतील व त्यांचे सांत्वन करतील. या भेटीनंतर ते पुन्हा विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Prakash ambedkar : ‘मुद्रा मोदी आता मुजरा मोदी झालेत’; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून थेट संघावर हल्ला

दत्ता मेघे आणि शरद पवार यांचे संबंध अत्यंत घनिष्ट होते. दत्ता मेघे यांच्या राजकीय प्रवासात पवारांचा मोठा वाटा होता. मेघे सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते असताना, शरद पवारांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना थेट राज्यमंत्री केले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी मेघे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. या एका निर्णयाने मेघे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. पुढे ते कॅबिनेट मंत्री झाले आणि नागपूर, रामटेक व वर्धा अशा तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे एकमेव खासदार ठरले.

Zilla Parishad election : प्रशासक राजचा पाचवा वर्षारंभ; जिल्हा परिषदेत लोकशाही ‘कोमात’

पवारांसोबत मेघे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, कालांतराने पक्षातील काही तरुण नेत्यांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या आठवणीने त्यांना रडू कोसळले होते. आज मी जो काही आहे, ते केवळ शरद पवारांमुळेच,अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर काँग्रेस आणि पुढे भाजपमध्ये प्रवेश केला, तरीही शरद पवारांनी त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका केली नाही. हीच त्यांच्यातील मैत्रीची प्रगल्भता होती.