Sharadchandra Pawar : होय..! काँग्रेस धोकेबाज, इतर समविचारी पक्षांना सोबत घेणार !

NCP Loses Faith in Congress, Decides to Contest Elections Independently : वाटाघाटी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष कुंटे पाटील व सलील देशमुखांवर जबाबदारी

Nagpur : उपराजधानी नागपूरमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडायला सुरूवात झाली होती. त्याचे पर्यवसन निवडणुकींच्या तोंडावर स्वतंत्र लढण्यामध्ये झाले आहे. काँग्रेस हा पक्ष धोकेबाज आहे, असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सोडून इतर समविचारी राजकीय पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक नागपुरातील रवी भवनमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्धार बोलून दाखवला. पक्षाचे विदर्भ प्रभारी आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षासोबत वाटाघाटी करताना सन्मानजनक जागावाटप होण्याची चिन्हे दिसत नसल्याने काँग्रेस पक्ष वगळून इतर धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काळी दिवाळी आंदोलन

सामाजिक संघटना व घटक पक्षांसोबत वाटाघाटी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील आणि युवा नेते सलील देशमुख यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेहमी आघाडी धर्म पाळत असतो. परंतु काँग्रेसकडून नेहमीच आघाडी धर्माचे पालन होत नाही. यावरून कार्यकर्त्यांनी बैठकीत रोष व्यक्त केला. येत्या सोमवारपासून पक्षाकडून इच्छुक उमेवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. तालुकानिहाय बैठकांचे नियोजन तालुक्यांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

Food and drugs supply department : दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट तांदूळ, गरीबांची थट्टा

बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, सलील देशमुख, किशोर बेलसरे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गजभिये, शेखर कोल्हे, अविनाश गोतमारे, अनिल साठोने, प्रेम झाडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली टालाटुले, दिनेश साळवे, रश्मी आरघोडे, रश्मी जामदार, योगेश धनुस्कर आदी उपस्थित होते.