Shashikant Khedkar : घरकुलांच्या प्रश्नावर शिंदे सेनेचा पंचायत समितीवर मोर्चा

Shinde Sena marches to Panchayat Samiti on the issue of housing units : गरजूंना तातडीने घरकुलाचा लाभ देण्याची मागणी

Deulgaoraja घरकुलांच्या वाटपातील अनियमिततेच्या निषेधार्थ शिंदे सेनेच्यावतीने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत “गरजू व सर्वसामान्यांना तातडीने घरकुलाचा लाभ द्यावा” अशी मागणी केली.

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पुढील पाच वर्षांत पक्के घर मिळावे यासाठी सरकारने मोठी योजना हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडून हजारो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे डॉ. खेडेकर यांनी सांगितले. मात्र देऊळगाव राजा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला.

PM Kisan Yojna : ‘सन्मान’ मिळाला; पण ‘महासन्मान’ची प्रतीक्षाच!

यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी पंचायत समितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांनी “ग्रामपंचायतीचा ठराव व घरकुलांची संपूर्ण यादी दहा दिवसांत उपलब्ध करून देऊ” असे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते रवींद्र इंगळे यांनी आजचे “ताला ठोको आंदोलन” स्थगित केल्याचे जाहीर केले.

Tribal Pardhi Conference : हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी पारधींचा उल्लेख !

मोर्चाला युवा नेते श्रीनिवास खेडेकर, उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, ओम पहाड, संदीप राऊत, स्वप्निल शहाणे, मोरेश्वर मीनासे, राजेश सपाटे, बंटी सुनगत, अमोल शिंगणे, विष्णू वखरे, गंगाधर नागरे, सुभाष डोईफोडे, सचिन व्यास, बालाजी इंगळे यांच्यासह घरकुल लाभार्थी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.