Shegaon blackmail case : शेगावमध्ये विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल!

shegaon-blackmail-case-student-threatened-obscene-photos-police-arrest-love-jihad-rumours-2026 : आरोपीला अटक, ‘लव्ह जिहाद’चा संशय, संभाजीनगरातही विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार!

Shegaon /Sambhajinagar : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरात २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय मोहम्मद शाकीर याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याने पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, संबंधित युवकाने “माझ्याशी संबंध ठेव, संभाषण सुरू ठेव, अन्यथा तुझे माझ्याकडे असलेले अश्लील फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी देत विद्यार्थिनीला मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीने सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शेगाव शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

Plastic flowers ban : लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर व हॉलवरही कारवाई!

या प्रकरणाची शहरात ‘लव्ह जिहाद’ म्हणून चर्चा सुरू असून काही ठिकाणी अफवा पसरत आहेत. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे केवळ कायदेशीर गुन्हा म्हणून पाहिले जात असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. तपास सुरू असून डिजिटल पुरावे आणि मोबाईल डेटा तपासला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये बोर्ड परीक्षेदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त असलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक घेऊन वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार तत्काळ कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी संस्था चालकासमोर संबंधित शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी त्याने चूक झाल्याचे कबूल केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Msc bank scam case : २५ हजार कोटींच्या शिखर बँक कर्जप्रकरणी सर्व 70 नेत्यांना दिलासा

यानंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केली. घटनेनंतर संस्थेने त्या शिक्षकाला तत्काळ निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दोन्ही घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू ठेवत नागरिकांनी शांतता राखावी व कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

__