Guardian Minister participated in ‘Jai Shivaji Jai Bharat’ yatra : ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत सहभागी झाले पालकमंत्री
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम उपक्रम असल्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने साजरी करण्यात आली. सक्करदरा येथे राजे रघुजी भोसले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन पदयात्रेला सुरुवात झाली. तर महाल येथील गांधी गेट स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले व पदयात्रेची सांगता झाली. यावेळी बावनकुळे यांनी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पोहोचावी आणि विकसीत भारताची संकल्पना अधिक मजबूत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ उपक्रमाची रचना केली. आज देशभर हा कार्यक्रम साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक, प्रशासक होते. जनतेच्या हिताचाच विचार सदैव मनात बाळगून कार्य करणाऱ्या जाणता राजाची प्रेरणा अंगीकृत करून महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Dharmapal Meshram : चार वर्षांत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले?
गांधीगेट येथील कार्यक्रमात अमोल खंते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी चिमुकल्यांनी शिवकालीन कलांचे सादरीकरण केले. राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा येथे संजूबा हायस्कूलचा विद्यार्थी अजित मोहिते याने शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट पोवाडा सादर केला. पदयात्रेला सुरुवात होण्यापूर्वी डॉ. संभाजी भोसले ग्रुप आणि शिवशक्ती आखाडा च्या विद्यार्थ्यांनी आखाडा प्रात्यक्षिके सादर केली. सी.पी. अँड बेरार चौक येथे जिम्नॅस्टिक असोसिएशन नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सादर केले.